शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीसाठी कणकवलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन!, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप

By सुधीर राणे | Updated: June 15, 2023 14:05 IST

जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्‍याचा आरोप

कणकवली: शून्य शिक्षकी शाळांवर तातडीने शिक्षक भरती करा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. कणकवली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्‍या. तसेच आठ दिवसांत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना देण्यात आले. शिक्षकांची पदे रिक्‍त ठेवून जिल्‍हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट राज्‍य सरकारने आखला आहे,असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. तसेच येत्या आठ दिवसात शाळांमध्ये शिक्षक न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांना आणून बसविण्यात  येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कणकवली येथील  शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी मोर्चा काढला. यावेळी काही विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.   तातडीने डी.एड. उमेदवारांची शिक्षण सेवक म्‍हणून भरती करा, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस उपस्थित होते. कणकवली तालुक्यात तोंडवली, वायंगणी, खारेपाटण, साळिस्ते, शिरवल या ठिकाणाच्या शाळा शून्य शिक्षक आहेत. या शाळांवर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शिक्षकसेवक पदे भरण्यात यावीत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर, तेजस राणे, सचिन आचरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, निसार शेख, वैभव मालंडकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, सिद्धेश राणे आदींनी सहभाग घेतला होता.जोरदार घोषणाबाजी!या आंदोलनाच्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शाळांमध्ये शिक्षक नसल्याने राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा निषेध यावेळी करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाTeacherशिक्षक