शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आराखडा निधी कमी होण्यास शिवसेनाच जबाबदार :नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:13 IST

शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे  केला.

ठळक मुद्दे नियोजन आराखडा निधी कमी होण्यास शिवसेनाच जबाबदारनीतेश राणे यांची टीका, नारायण राणे यांनी मांडलेला मुद्दा खरा ठरला

कणकवली : शिवसैनिकांना सांगून स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या वैभव नाईक यांचे अजितदादांसमोर मांजर कसे झाले? २४० कोटींचा आराखडा ११८ कोटी रुपयांचा मंजूर कसा झाला? या अपयशाला शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथे  केला.ते म्हणाले, जिल्हा नियोजनच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या विकासनिधीच्या वक्तव्यांवर बोट ठेवत खासदार नारायण राणे यांनी ४० टक्के अखर्चित निधी असल्याचे लक्षात आणून दिले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांना मी चांगला ओळखतो.

तुमच्या निधीला निश्चितच कट लागणाऱ, असे त्यांनी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात केवळ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नियोजनच्या सभेत वैभव नाईक जोरजोराने ओरडून आपण अभ्यासू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. ते या निधीच्या आकडेवारीवरून सपशेल तोंडावर पडले आहेत़.सभागृहात बोलताना पालकमंत्र्यांनी २४० कोटी रुपयेच आणले जातील, असे आश्वासित केले होते़ मात्र, शेवटी अर्थमंत्र्यांनी या शिवसेनेच्या नेत्यांची कुवत ओळखून निधी दिला आहे. जे गेल्यावर्षीचा निधी १०० टक्के खर्च करू शकत नाहीत ते २४० कोटी कुठल्या तोंडाने मागतात? असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी विचारला. या अपशयाला शिवसेना जबाबदार असल्याचा टोला आमदार राणे यांनी यावेळी लगावला.नारायण राणे पालकमंत्री असताना सातत्याने जिल्हा नियोजनचा आराखडा वाढत गेला. मात्र, उदय सामंत यांच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनचा आराखडा ५० टक्के कपात झाला़ हे सिंधुदुर्गचे मोठे नुकसान आहे. याची जाणीव जनतेला झाली आहे.

शेतकरी व मच्छिमारांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या निधीच्या कमतरतेमुळे संपूर्ण व्यवसाय व आर्थिक उलाढालीवर परिणाम होणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केली़

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे