शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

..अन् जिवंत असतानाच त्यांना दाखवलं मृत, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:58 IST

मृत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केली

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा क्रीडाक्षेत्रात काम करणाऱ्या वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना संघटनेतून बाहेर करण्यासाठी जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील त्यांचे आजीवन सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हे पद रद्द करताना अध्यक्ष व कार्यवाहकांनी केसरकर जिवंत असतानाच त्याना मृत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे क्रीडाक्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत केसरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच ते लवकरच कबड्डी फेडरेशनचे राष्ट्रीय पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेणार असून सिंधुदुर्गची कार्यकारणी तत्काळ बरखास्त करण्याची मागणी करणार आहेत.सावंतवाडी जिमखाना येथे १९८३ साली सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व कबड्डीचा प्रसारासाठी हे फेडरेशन निर्माण झाले. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ मंडळी यात होती. पण त्यातील काहीचा मृत्यू झाल्यानंतर हे फेडरेशन युवकांच्या हाती आले. या काळात काही चुकीचे प्रकार घडले. असे असतानाही अलीकडेच या फेडरेशनची माहिती घेतली असता आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला.चक्क फेडरेशनचे अध्यक्ष व कार्यवाहकांनी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तकांडे जमा केली. अन् त्यांचे नाव सदस्य यादीतून कमी केले. विशेष म्हणजे या कार्यकारणीला धर्मादाय आयुक्तांनी मंजूरी देऊन सिंधुदुर्ग न्यायालयाची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी केसरकर यांनी केली आहे. तसेच सावंतवाडी पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे.या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून चक्क एका राजकीय नेत्यालाच मृत दाखवण्याचे धाडस करण्यात आले असून  त्यांचे सभासदत्व ही रद्द करण्यात आले असल्याने हा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.शेवटपर्यंत प्रकरण लावून धरणार : केसरकरआम्ही स्थापन केलेल्या कबड्डी फेडरेशन मध्ये आम्हालाच कागदोपत्री मृत दाखवण्यात आले. हे मोठे धाडस. जिवंतपणी मृत दाखवणे हा मोठा गुन्हा असून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असे वसंत केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना