शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली शहरात शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:56 IST

Shivsena, Kankavli, Shindudurngnews सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकासकामे गतीने होतील. त्यामुळे कणकवली शहरात किमान ४००० शिवसेनेचे सदस्य झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.

ठळक मुद्देचार हजार सदस्य नोंदणी करा : अतुल रावराणे, विकासाचा झंझावात कायम राहीलकणकवली शहरात शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ

कणकवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे अनेक पक्षविरहीत कार्यकर्ते समाजात आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणी देखील संघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची करा. विकासाचा झंझावात यापूर्वीदेखील आमदार वैभव नाईक यांनी राखला. आता सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकासकामे गतीने होतील. त्यामुळे कणकवली शहरात किमान ४००० शिवसेनेचे सदस्य झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ विजय भवन येथून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक विकास कुडाळकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, नगरसेविका माही परुळेकर, मानसी मुंज, अँड. हर्षद गावडे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, प्रसाद अंधारी, सोमा गायकवाड, वैभव मालंडकर, गौरव हर्णे, संतोष पुजारे, तेजस राणे आदी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी अतुल रावराणे म्हणाले, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर प्रेम करण्यापेक्षा पक्षावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची नोंदणी झाली पाहीजे. जेणेकरून आयाराम, गयाराम थांबले पाहिजेत. सुशांत नाईक म्हणाले, हे अभियान म्हणजे सेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे यासोबतच मतदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या निवारण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.यावेळी कणकवली वरचीवाडी महिला शाखाप्रमुखपदी रोहिणी पिळणकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत अभिनंदन करण्यात आले. तर आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.कणकवलीत प्रभागनिहाय सदस्य नोंदणीची देण्यात आलेली जबाबदारीप्रभागनिहाय सदस्य नोंदणीसाठी जबाबदारी देण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १ - शेखर राणे, संतोष राणे, तेजस राणे. प्रभाग क्र. २ - साक्षी आमडोस्कर, रोहिणी पिळणकर, प्रमोद पिळणकर. प्रभाग क्र. ३ - संजना संत, रवी राणे, सुमित राणे. प्रभाग क्र. ४ - दादा परब, भिवा परब. प्रभाग क्र. ५ - अश्विनी मोर्ये, मेघन सरंगले. प्रभाग क्र. ६ - संदेश वाळके, कन्हैया पारकर, आदित्य सापळे. प्रभाग क्र. ७ - प्रसाद अंधारी, महेश देसाई. प्रभाग क्र. ८ - अनिल जाधव, लुकेश कांबळे, भक्ती जाधव. प्रभाग क्र. ९ - वैभव मालंडकर, विलास कोरगावकर, समीर सावंत. प्रभाग क्र. १० - सोमा गायकवाड, माही परुळेकर, प्रमोद मसुरकर, संतोष पुजारे. प्रभाग क्र. ११ - सुजित जाधव, संतोष पुजारे. प्रभाग क्र. १२ - गौरव हर्णे, बाळा वराडकर. प्रभाग क्र. १४ -अमित मयेकर, रुपेश नार्वेकर, संजय पारकर, अजित काणेकर, अमोल रासम. प्रभाग क्र. १५ - योगेश मुंज. प्रभाग क्र. १६ - सोहम वाळके, रुपल परब. प्रभाग क्र. १७ - समीर सावंत, बाबू जाधव अशी प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली असून प्रभागात २०० हून अधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली