शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:02 IST

Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

ठळक मुद्देभाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले विनायक राऊत यांनी केले स्पष्ट; शहांच्या टीकेला प्रत्युत्तर

सिंधुदुर्गनगरी : केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्यांचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणीही आहेत. त्याच दैवताचा आशीर्वाद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाभला; म्हणूनच तर ते सध्या दिसत आहेत. नाहीतर त्यांचे काय झाले असते हे मी आता सांगू शकत नाही. गोध्रा हत्याकांड प्रकरणात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणूनच ते वाचले, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.निवडणूक प्रचारात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत, असे भाजप सांगत होते. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत असे शहा यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, निवडणूक प्रचाराची वेळ एकमेकांना सांभाळून घ्यायची वेळ असते. त्यावेळी भांडायचे नसते. ही निवडणूक शिवसेना-भाजप असे आम्ही एकत्र लढत होतो; त्यामुळे त्यावेळी काही बोललो नाही.आम्ही फसवले नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे भाजपने कृतघ्नता दाखवायला सुरुवात केली; त्यामुळे भाजपला शहाणपण शिकवणे गरजेचे होते. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या पाठीमागून किती वेळा आरत्या फिरवत फिरायचे असा प्रश्न यावेळी खासदार राऊत यांनी करतानाच युती मोडल्याचे दुःख आम्हांला बिलकुल नाही. मात्र, ही युती तोडण्यास भाजप आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आदी कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिकोराज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली आहे. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची, हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्यापाठी ह्यईडीह्ण लावायची, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Sadhअमित संधsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत