शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: September 1, 2022 20:50 IST

शिक्षकांकडून अतिरिक्त कामे कोण करून घेत असेल तर ते चुकीचे आहे.

सावंतवाडी :  शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ती त्यांचे स्वप्न आहे. आणि ती दिवास्वप्नेच राहातील, आपले आमदार साभाळा नाहीतर एक आमदार अगोदरच  गेला  आता आहे ते जरी गेले तरी  कळणार  नाही.त्यामुळे चुकीची वक्तव्ये करून नका असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी सावंतवाडीत पत्रकारांशी सवाद साधतना वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडली यावेळी त्यांनी शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी दिली पाहिजे. राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करू असे ही सांगितले.

शिक्षकांकडून अतिरिक्त कामे कोण करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र, राष्ट्रीय कामे त्यांच्याकडून करून घेतलीच पाहिजेत. मात्र अन्य कामे त्यांच्याकडून कोण करून घेत असेल तर या प्रकाराची चौकशी केली जाईल.येत्या आठवड्यात बैठक घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, चुकीच्या पद्धतीने आदेश देणाऱ्यांची चौकशी केली जाईल, अशी भुमिका ही केसरकर यांनी घेतली.शिंदे गटातील आमदार जाणार नाहीत, असे सांगितले. मात्र कोण दावा करत असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. अशा प्रकारे कोणीही जाणार नाहीत. वारंवार यापूर्वी दावे केले जात आहेत. मात्र ते त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असाही टोला त्यांनी आणला.

आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या विधानाबाबत मंत्री केसरकर यांना विचारले असता याबाबत आपल्याला अद्याप पर्यंत माहिती घेतली नाही. त्यामुळे मी कोणतेही वक्तव्य करणार नाही, माहिती घेऊन निश्चितच बोलेन, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग