शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार

By अनंत खं.जाधव | Updated: June 23, 2023 17:43 IST

सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही.

सावंतवाडी : रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रश्नात आपण लक्ष घालू असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. याबाबत ते दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी २६ जूनला चर्चा करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा म्हणून मला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली. यावेळी नियोजित बांदा-संकेश्वर महामार्ग सावंतवाडी शहरातून जाण्यासाठी पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. यातील बरेचसे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे टर्मिनस मंजूर असूनही कोणताही फायदा सावंतवाडीला झालेला नाही. वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यावेळी सावंतवाडीत वंदे भारतला थांबा देण्याची मागणी करण्यात आली.या पार्श्वभूमीवर घारे - परब यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे मांडला. त्यावेळी हा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांना दिल्लीत पाचारण केले आहे. येत्या २६ जूनला दिल्लीत याबाबत बैठक होणार आहे. त्यासाठी खासदार विनायक राऊत यांनाही बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दोघे तसेच पक्षातील महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, असे घारे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेSharad Pawarशरद पवार