शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

श्वास चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत वेंगुर्ले शहराचे स्वच्छता अ‍ॅम्बॅसिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:30 IST

वेंगुर्ले नगरपरिषदेने आयोजित केलेल्या स्वच्छता साक्षरता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले शहराचे स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर, श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते सोमवारी वेंगुर्ले बाजारपेठ परिसरात कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी वेंगुर्ले बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

ठळक मुद्देवेंगुर्ले शहरात कचरा डस्टबीनचे वाटप बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेने आयोजित केलेल्या स्वच्छता साक्षरता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले शहराचे स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर, श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते सोमवारी वेंगुर्ले बाजारपेठ परिसरात कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी वेंगुर्ले बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.वेंगुर्ले शहराने स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेत देशात प्रथम येण्यासाठी सज्ज झाली आहे. जानेवारी ते मार्च २०१८ या वर्षात केंद्र सरकारकडून देशात स्वच्छतेच्या बाबतीत परिपूर्ण असणारी दहा शहरे निवडली जाणार असून, या स्पर्धेसाठी वेंगुर्ले शहराचे नामांकन झाले आहे. केंद्र्र शासनाने निवडलेल्या दहा शहरांमध्ये वेंगुर्ले शहराचा समावेश असून, त्याकरिता निकष पूर्ण करण्यासाठी चार हजार गुण मूल्यांकनासाठी ठेवण्यात आलेले आहेत.

स्वच्छतेत देशात प्रथम येण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने प्रसिद्ध निर्माते व  श्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांची वेंगुर्ले शहर स्वच्छतेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत पालिकेने स्वच्छताविषयक उपक्रम राबवून सुरुवात केली.

यावेळी दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते बाजारपेठेतील दुकानदारांना कचरा डस्टबीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वेंगुर्ले बसस्थानक तसेच आजूबाजूच्या वर्दळीच्या ठिकाणी भेटी देऊन परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता राखणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी रामदास कोकरे, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे, सुमन निकम, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष गिरप यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डची जबाबदारी नगरसेवकांनी वाटून घ्यावी व स्वछतेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे, असे आवाहन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका