शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा!, प्रमोद जठारांची मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

By सुधीर राणे | Updated: September 30, 2022 17:50 IST

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापुर्वी बांधला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापुर्वी बांधला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गे येणाऱ्या फ्रेंच, पोर्तुगीज सिद्धी जोहर व इंग्रजांचे आक्रमण थोपवण्यासाठी सुसज्ज आरमाराचे बांधकाम याच किल्ल्याच्या परीसरातील समुद्रात सुरू केले. त्यामुळे हा इतिहास पुढील पिढीच्या कायम लक्षात रहावा यासाठी विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या आरमाराचे नेतृत्व सरखेल कान्होजी आंग्रे करीत होते. जहाज बांधणी सोबत महाराजांनी या समुद्रात संरक्षण भिंत सुद्धा बांधली. परकीय आक्रमकांपासून महाराष्ट्राचे संरक्षण केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौसेनेच्या झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'भारतीय आरमाराचे जनक' असा करून त्यांच्या राजमुद्रेचा समावेश भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये केला. हा सर्व इतिहास आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात आरमाराचे संग्रहालय निर्माण करून व्हावे.या संग्रहालयासाठी विजयदुर्ग किल्ल्या शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाची  जागा असुन तेथे असलेले विश्रामगृह सध्या उपयोगात नसल्याने त्या जागेत हे आरमार संग्रहालय अत्याधुनिक पद्धतीने व्हावे. राष्ट्र निर्मितीच्या या कार्यासाठी लागणाऱ्या १० कोटी रूपयांच्या निधीची तरतुद  आपल्या सांस्कृतीक मंत्रालयाकडुन करावी व त्या संबंधीची बैठक आपल्या दालनात लावावी अशी मागणी प्रमोद जठार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही दिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार