शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ नेत्यांमुळे भाजपचा पराभव? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाची कणकवलीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 18:24 IST

चिंतन बैठकीत कणकवलीतील पराभवावर चर्चा

कणकवली : वरिष्ठ नेते कमी पडल्यानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत चव्हाण यांनी 'वरिष्ठ नेत्यांना पराभव पत्करावा लागला', असं म्हटल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा नारा दिला. वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. पराभवानं खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आलं. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपने अनेक पराभव पचवले आहेत. पण भाजप कधीच डळमळला नाही. त्याच ताठ मानेने भाजपने केंद्रात व राज्यातही मुसंडी मारली. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं न डगमगता पुढील निवडणुकीला धैर्याने सामोरे जा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. संदेश पारकर यांचा फक्त ३७ मतांनी पराभव झाला. पारकर यांना ऐन निवडणुकीत रिंगणात उतरवलं. तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. संदेश पारकर यांनी जिद्दीनं रणांगणात उतरून शत्रूच्या तोंडाला फेस आणला, असं म्हणत चव्हाण यांनी  पारकर यांचं कौतुक केलं. 

टॅग्स :BJPभाजपा