शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सुसज्ज आयसीयू उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवा ! उदय सामंत यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:49 IST

coronavirus, hospital, sindhudurgnews, udaysamant जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा आयसीयू उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अधिकारी वर्गाला दिल्या.

ठळक मुद्दे सुसज्ज आयसीयू उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवा !उदय सामंत यांची सूचना

ओरोस : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा आयसीयू उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अधिकारी वर्गाला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पालकमंत्री सामंत यांनी कोविड-१९ चा जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा बैठक घेतली . या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, आरोग्य अधिकारी श्री. कांबळे, तहसिलदार अमोल पाठक आदी उपस्थित होते.सध्याच्या कोविड काळातील आरोग्य यंत्रणा सुधारणासाठीच्या संधीत रुपांतर करावे, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हृयातील सध्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्हीटी रेट हा 0.03 टक्के आहे. त्यामुळे लोकांनी भिती बाळगण्याचे कारण नाही. पण नागकरीकांनी अजूनही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जे स्थानिक व्यापारी, नागरिक आणि स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू करणार आहेत. त्यांचे स्वागत आहे. त्याला प्रशासनाने सर्व सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन आता लॉकडाऊन करणार नाही, पण जनता कर्फ्यू करण्यास आमचे सहकार्य राहिल. जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अजून प्रयत्न करावेत.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. याला नागरिकांनी पहिल्या टप्प्याप्रमाणे सहकार्य करावे. सध्याची परिस्थिती पाहता आपण लवकरच शुन्यावर पोहचू असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, उपचार, रुग्णसंख्या पॉझिटीव्हीटी रेट, मृत्यूदर, खाजगी कोविड सेंटर, माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वांचा सविस्तर आढावा घेतला.जिल्हृयातील आतापर्यंतच्या मृत्यूची कारणे व त्याचे विश्लेषण करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. या समितीमध्ये शासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांसह खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. सध्या ही समिती कोविडमुळे झालेल्या मृत्युचे ऑडिट करत असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग