शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद लोके खून प्रकरण तपास सीआयडीकडे द्या, संदेश पारकर यांनी केली मागणी

By सुधीर राणे | Updated: September 27, 2023 13:23 IST

कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा ...

कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात पोलिस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे. हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणेवर भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विश्वास राहिलेला नाही, हेच सिद्ध होते. आरोपीने वैद्यकीय कारणांची ढाल समोर केली आहे. स्थानिक पोलिस यासंदर्भात ठोस माहिती देण्यास कुचराई करीत आहेत. जर आरोपीची प्रकृती ठीक नसेल तर तो एवढी मोठी हत्या एकटा कसा काय करू शकतो? याप्रकरणी अन्य काही आरोपी असल्याचा पोलिसांनाही संशय आहे, मग त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोलिस का पोहोचू शकत नाहीत? स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम नसल्याचा स्थानिक जनतेचा आरोप आहे.

स्थानिकांच्या सोबत राहणे हा शिवसेनेचा धर्म आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे. तसेच आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावेत. तपासात दिरंगाई अथवा ढिलाई आढळून आल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस