शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:31 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर सोडण्याचा घाट घातला जात आहे. याला आमचा प्रखर विरोध आहे. जर शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडले तर शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

ठळक मुद्देआंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते ...अन्यथा आंदोलनाचा इशारा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर सोडण्याचा घाट घातला जात आहे. याला आमचा प्रखर विरोध आहे. जर शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडले तर शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेतून दिला.संजय पडते आणि नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर कडाडून टीका केली. जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना आंतरजिल्हा बदली पात्र ६८ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा घाट घातला जात आहे, याला आमचा विरोध आहे. गतवर्षीही जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा विरोध असतानाही १७६ शिक्षकांना आर्थिक व्यवहार करून जिल्ह्याबाहेर सोडले होते.शिक्षकांची रिक्तपदे जिल्ह्यात असताना आणि नव्याने शिक्षक भरतीला बंदी असताना जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची घाई करीत आहे. जोपर्यंत नव्याने भरती होत नाही तोपर्यंत संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करू नये असे वारंवार सांगत असताना व तसे ठराव झालेले असताना जिल्हाबाहेर जाणाºया ६८ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा घाट घातला जात आहे .त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होतो की काय असा संशय आहे. जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, असा खळबळजनक आरोप संजय पडते व नागेंद्र परब यांनी केला. तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास आमचा प्रखर विरोध आहे. तरीही जर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे जर आंतरजिल्हा बदली करून काही शिक्षक गेले तर शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीsindhudurgसिंधुदुर्ग