शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेते तरले; बागायतदार हरले

By admin | Updated: June 13, 2015 00:19 IST

हवामानाचा फटका : यंदा झाले ७० टक्के पिकाचे नुकसान

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे यावर्षी हापूस आंबापीक धोक्यात आले. ७० टक्के पिकाचे नुकसान झाले. उत्पादन कमी झाले व दरही गडगडले. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी पावसापूर्वी काढण्याची घाई केली. त्याचा फायदा विक्रेत्यांना झाला. एकूणच यावर्षी ‘विके्रत्यांना तारले मात्र बागायतदार हरले’, अशी स्थिती निर्माण झाली आहे.नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने यावर्षी नेहमीपेक्षा दोन आठवडे आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातच फेब्रुवारीच्या शेवटच्या व मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबापिक धोक्यात आले. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला. फेब्रुवारी, मार्चमध्ये किरकोळ स्वरूपात असलेल्या आंब्याची एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारपेठेत आवक वाढली. सुरुवातीला ३५०० ते ४५०० हजाराच्या घरात असलेला दर आवक वाढल्यानंतर गडगडला. एप्रिलमध्ये कँनिगला सुरूवात झाली. मात्र, एप्रिल, मे महिन्यात आलेल्या अवेळच्या पावसाचा फटका आंब्याला बसला. शिवाय तापमान वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला. मे महिन्यात आंब्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. आंब्याचा दर ७० ते ८० रूपये डझन इतका खाली आला. स्थानिक मार्केटमध्येही आंब्याची आवक वाढली. त्याचदरम्यान कर्नाटक हापूस बाजारात दाखल झाला. ग्राहकांचा भूलभुलय्या करण्यात आला. पावसापूर्वी आंबा काढून घेण्यात शेतकरी मग्न झाले. आंबा नाशिवंत फळ असल्याने ठेवण्यापेक्षा कॅनिंग घालणे वा मार्केटला मिळेल त्या भावाने विक्री सुरू ठेवली. मुंबई मार्केटमध्ये ८०० ते १२०० रूपये दर पेटीला उपलब्ध होता. मात्र मजुरी, पॅकिंग, वाहतूक, हमाली, दलाली आदी खर्च वजा जाता बागायतदारांच्या हातात अल्प किंमत शिल्लक राहिली. शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी गुंतवलेली रक्कमही वसूल न झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला.यावर्षी युरोप, न्युझीलंड, अमेरिका, जपान तसेच आखाती प्रदेशातून आंब्याला मागणी होती. मुंबईतून आंबा निर्यात सुरू होती. मागणी असूनही उत्पादन अल्प असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकलेला नाही. पुढील काळातही मागणी वाढतच जाणार आहे मात्र हवामानाची साथ हवी. गतवर्षी कोकणातून ६५ ते ७० लाख पेट्या मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी जेमतेम १५ लाख आंबा पेट्या विक्रीस आल्या असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा फारच कमी होता, असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी हापूस सुरू असतानाच कर्नाटकमधून आंबा पाठवण्यात आला. सुरूवातीला २९ रूपये कॅनिंगचा असलेला दर १८ रूपयांपर्यंत खाली आला. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी घाई केली. १५ ते २० मे पूर्वीच ७० टक्के शेतकऱ्यांनी पीक काढणी पूर्ण केली. (प्रतिनिधी)आंब्याची आवक मोठी तापमानातील बदलामुळे आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी वाशी मार्केटबरोबर पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद मार्केटचा आधार घेतला. किरकोळ विक्रीबरोबर खासगी विक्री सुरू ठेवली. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांनी धोका पत्करून स्वबळावर विक्री केली. खासगी विक्रीमध्ये चार पैसे मिळवण्यासाठी दर्जादेखील कायम ठेवावा लागतो. मोठी उलाढाल असलेल्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे प्रतवारीनुसार दररोज मार्केटला आंबा पाठवावाच लागतो. पावसामुळे शेतकऱ्यांनी घाई केली. मान्सूनपूर्व पाऊस या नैसर्गिक कारणांबरोबरच काढणीदरम्यान शेतकऱ्यांना मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडासावत होती. त्यामुळेही शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली असून, हेक्टरी २५ हजार रूपयेप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण केले जाणार आहे.