शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षीत करा, पत्रकार संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:26 IST

भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षीत कराकणकवली तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदनसंयुक्त पाहणीची केली मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर ब्रिटीश कालीन पुलांचे कोसळलेले कठडे व भलेमोेठे पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.

भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी निता सावंत-शिंदे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, रमेश जोगळे, अजित सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश सरकारे, मोहन पडवळ, सुधीर राणे, तुषार सावंत, स्वप्नील वरवडेकर, प्रदीप भोवड, संजय राणे, अनिकेत उचले, पंढरीनाथ गुरव, तुळशीदास कुडतरकर, संजय बाणे, भास्कर रासम आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.मुंबई-गोवा महामार्गाचे काम करत असताना खारेपाटण ते ओसरगाव या ५७ किमीच्या कार्यक्षेत्रात अत्यंत धोकादायक खड्डे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे, गडनदी पुल, जानवली पुल, बेळणे पुल, पियाळी पुल, कसाल पुल यासह अन्य पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या खड्यांमुळे दिवसेंदिवस ही ब्रिटीशकालीन पुले कमकुवत होत चालली आहेत. जीवघेण्या खड्यांमधून प्रवास करताना वाहनाची हानी व चालकांना, प्रवाशांना मान, मनका, कंबर दुखी यासारखे आजार जडत आहेत. या समस्येबाबत गणेश चतुर्थीपूर्वी तोडगा काढण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी असा संयुक्त निरीक्षण दौरा करून या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी भगवान लोके यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली.त्यावर प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत येत्या कालावधीत दुरूस्तीसाठी संबंधित यंत्रणेला सूचना ताबडतोब करण्यात येतील़ तसेच संयुक्त पाहणी दौरा संबंधित यंत्रणेसोबत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळातील ज्येष्ठ पत्रकारांनी महामार्गाच्या समस्यांबाबत अनेक ठिकाणी असलेल्या दुरावस्थेची परिपुर्ण माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिली. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्गreporterवार्ताहर