ओरोस जिल्हा रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 PM2021-04-14T16:32:18+5:302021-04-14T16:33:58+5:30

CoronaVirus Sindhudurg : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबाबत आमदार नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांच्यासमवेत चर्चा केली. लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल, असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.

A second oxygen plant will be started soon at Oros District Hospital | ओरोस जिल्हा रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. (छाया : मनोज वारंग )

Next
ठळक मुद्देओरोस जिल्हा रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार अपर्णा गावकर यांची माहिती : वैभव नाईक यांनी आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

ओरोस : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबाबत आमदार नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांच्यासमवेत चर्चा केली. लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल, असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार नाईक यांनी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, जेवण, पाणी, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, कोविड सेंटरमधील सुविधा, विलगीकरण व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा, कोविड लसीचा पुरवठा याबाबत डॉ. अपर्णा गावकर यांच्याकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला. वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आमदार नाईक यांनी केल्या. याप्रसंगी ओरोस जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शाम पाटील, फार्मासिस्ट अनिल देसाई व इतर आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: A second oxygen plant will be started soon at Oros District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.