शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:41 IST

माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणेसावंतवाडीत राणे यांची पत्रकार परिषद

सावंतवाडी : माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. मायनिंगच्या पैशावर घर चालवणाऱ्यांनी आमच्यावर खंडणीचे आरोप करू नयेत, असा टोलाही राणे यांनी यावेळी केसरकर यांचे नाव न घेता लगावला.निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपल्यानंतर राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार नीतेश राणे, राजन तेली, संजू परब, अतुल काळसेकर, रेश्मा सावंत, संदीप कुडतरकर, राजू राऊळ उपस्थित होते.राणे म्हणाले, मी जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. पण ते प्रकल्प बंद पाडण्याचे काम माजी पालकमंत्र्यांनी केले आहे. ज्या व्यक्तीला विकास कसा असतो हेच माहीत नाही, त्याच्याबद्दल काय बोलायचे? नगरपालिका निवडणुकीत विकासाबद्दल चर्चा झाली नाही.

फक्त राणेंवर टीका हा एकमेव अजेंडा घेऊन केसरकर हे निवडणुकीत उतरत असतात. पण यातून शहराचे भले होणार नाही. सावंतवाडीतील एकही प्रकल्प सुरू नाही. सर्व प्रकल्प बंद आहेत. मग विकास कसा म्हणायचा, असा सवाल राणे यांनी केला आहे.मी निधी दिला नाही असे जर केसरकर सांगत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बघावे. जनतेची दिशाभूल करणे सोपे असते. पण जे सत्य असते ते नाकारू शकत नाही, असेही राणे म्हणाले. माझा उमेदवार काम करणारा आहे. मला फक्त पुढील दीड वर्ष द्या. मी सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो. मोती तलावाचा विकास म्हणजे सावंतवाडीचा विकास समजू नका. येथे अनेक प्रकल्प करण्यासारखे आहेत, असे राणे यांनी सांगितले.शिवसेनेचे पदाधिकारी खंडणी मागतातशिवसेनेचे पदाधिकारी खंडणी मागतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शुक्रवारी रोखण्यात आलेले डंपर. मात्र, हे डंपर शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्याने रोखले ते खंडणीसाठीच काय? असा सवाल करत खंडणीचे पैसे घेऊ नका असे मतदारांना सांगता, मग खंडणी कोण मागतो हे पहिले ठरवा, अशी टीका राणे यांनी केली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग