शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वायफाय असलेले सावंतवाडी राज्यातील पहिले शहर ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:07 IST

WiFi Sawantwadi Sindhudurg- जम्प नेटवर्कच्या माध्यमातून सावंतवाडी शहरामध्ये मोफत वायफाय सेवा देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील मोफत वायफाय असलेले सावंतवाडी हे पहिले शहर ठरेल.

ठळक मुद्देमोफत वायफाय असलेले सावंतवाडी राज्यातील पहिले शहर ठरेल : दीपक केसरकरजम्प नेटवर्कच्या मोफत सेटअप बॉक्सचे वितरण

सावंतवाडी :जम्प नेटवर्कच्या माध्यमातून सावंतवाडी शहरामध्ये मोफत वायफाय सेवा देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही सेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील मोफत वायफाय असलेले सावंतवाडी हे पहिले शहर ठरेल. त्यानंतर हळहळू संपूर्ण जिल्हाभरात हे जाळे विणले जाणार आहे. त्यासाठी दूरसंचार कंपनीशी करार करण्यात आला असून दूरसंचारकडून सीमकार्ड माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरू करण्यात येणारी ही सेवा भविष्यातही सुरळीत चालू राहण्यासाठी साबळे यांनी स्वत: यात लक्ष घालावे, असे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर म्हणाले.

सावंतवाडीत एखादी गोष्ट व्हायला वेळ लागतो. मात्र, भविष्यात त्याची भरभराट होते. जम्प नेटवर्कही येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला महत्त्वाचा दुवा ठरेल, असे मत  केसरकर यांनी येथे व्यक्त केले. जम्प नेटवर्कच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर १०० लोकांना मोफत सेटअप बॉक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, हर्ष साबळे, मकुंदन राघवन उपस्थित होते.केसरकर म्हणाले, मी पालकमंत्री असताना ज्या घोषणा विकासाच्या दृष्टीने केल्या होत्या त्यातील जम्प नेटवर्क हे एक आहे. जम्प नेटवर्कच्या माध्यमातून लवकरच ५०० बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात येणार आहे. या जम्प नेटवर्कचे सेटअप बॉक्स दुसऱ्या टप्प्यात सावंतवाडी शहरात बनविण्यात येणार असून, मेक इन इंडिया ही संकल्पना याठिकाणी सत्यात उतरविण्यात येणार आहे. याचे सर्व श्रेय साबळे यांना द्यावे लागेल. 

टॅग्स :WiFiवायफायSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग