शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली, अन्...

By अनंत खं.जाधव | Updated: August 25, 2022 18:25 IST

एका पोलिस कर्मचार्‍याने त्यांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र वाटेतच त्या अत्यवस्थ असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

सावंतवाडी : अत्यवस्थ असलेल्या तरुणाला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार बावळाट तिठ्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांमुळे उघड झाला. हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्या युवकाला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.मानतेश चंद्रप्पा कुमारी (वय-३८, रा. बेळगाव-बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. यात तुर्तास तरी संशयास्पद असे काहीच नाही. ती व्यक्ती अति प्रमाणात मद्यसेवन करित होती, त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दाणोली-बावळाट येथे तपासणी नाक्यावर वाढत्या चोर्‍याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री तपासणी करण्यात आली होती. यावेळी एक कार त्या ठिकाणी असलेल्या अजित घाडी, प्रविण सापळे, विलास नर, प्रशांत आरोलकर, मयुर सावंत आदी पोलिस कर्मचार्‍यांनी थांबवली असता, त्यात चार व्यक्ती एका तरुणाला धरुन बसलेले दिसले.यावेळी त्याच्याबाबत विचारणा केली असता तो बेशुध्द असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना त्यात काही तरी संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तुम्ही गावाला नेण्यापुर्वी रुग्णालयात न्या, असा सल्ला पोलिसांना दिला. तसेच त्यातील एका पोलिस कर्मचार्‍याने त्यांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा वाटेतच मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकार्‍यांकडुन सांगण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस