शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी: आमदार केसरकराच्या बैठकीतील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; टेस्टनंतरही कामकाजात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:51 IST

नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट दिली होती.

सावंतवाडी : एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असताना सर्वत्र कडक निर्बंध लादले जात आहेत मात्र दुसरीकडे नगरपालिकेचा दिखावापणा उघड झाला असून जे नियम बनवतात तेच आता कोरोनाला हलक्यात घेऊ लागलेत की काय  असा प्रश्न एका निष्काळजीपणा दाखवून अनेकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे उपस्थित होऊ लागला आहे.

नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट दिली होती त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी आला. यात हा अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले खरे पण तत्पूर्वी हा अधिकारी सकाळीच आमदार दिपक केसरकर यांच्या तहसीलदार कार्यालयांतील  बैठकीसह तसेच शहरातील वेगवेगळ्या नागरिकांमध्ये फिरत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे कोरोना फक्त नागरिकांसाठीच आहे की काय असा आता सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सावंतवाडी नगरपालिकेने कोरोना बाबत कडक नियमावली अवलंबली आहे चक्क मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तर त्यांना भेटायला येणाऱ्याचा कोरोना अहवाल बघितल्याशिवाय भेट देणार नाही अशी भूमिका घेत चक्क फलकही लावले आहेत तसेच शहरातील नागरिकांकडून ही कोरोना नियम पाळले जावेत यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही ही आखण्यात आल्या आहेत मात्र नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करत असताना मात्र नगरपालिकेत कोरोना नियम धाब्यावर बसवत असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.

कारण नगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला थोडासा त्रास होऊ लागल्याने आरटीपीसीआर टेस्ट केली होती.ही टेस्ट केल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कोणत्याही शासकीय कामात सहभागी होता कामा नये होते पण हा अधिकारी नागरिकांसह पालिकेच्या कामकाजात ही सहभागी झाला होता त्यातच शुक्रवारी सकाळी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जी तहसिलदार कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीत ही हा अधिकारी सहभागी झाला या बैठकीत आमदार केसरकर यांच्या समवेत अनेक वरिष्ठ अधिकारी ही उपस्थितीत होते.त्यानंतर सायंकाळी उशिरा या अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मात्र सगळ्यात खळबळ माजली आहे.

त्यामुळे नगरपालिकेचा कोरोना मधील फोलपणा ही उघड झाला आहे.एरव्ही सामान्य नागरिकांना कोरोना बाबत अनेकांना नियम शिकवणारे स्वता मात्र कोरोना ला हलक्यात घेऊन इतराचा जीव कसा धोक्यात घालत आहेत यातून दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी