शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सावंतवाडी पालिका पोटनिवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:16 IST

भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कोरगावकर यांनी अपक्ष व भाजप असे दोन अर्ज दाखल केले. हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केले आहेत.

ठळक मुद्दे सावंतवाडी पालिका पोटनिवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी अटळअन्नपूर्णा कोरगावकर यांचा अर्ज दाखल

सावंतवाडी : भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कोरगावकर यांनी अपक्ष व भाजप असे दोन अर्ज दाखल केले. हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केले आहेत.यावेळी प्रसाद कोरगांवकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, विराग मडकईकर, साक्षी कारिवडेकर, आनंद मिशाळ, संगीता वाडकर, सविता गव्हाणे, शिवम सावंत, रोहित पवार, रामचंद्र पवार, अलफाज मुल्ला, जयदीप बल्लाळ आदी उपस्थित होते.बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक आहे. भाजपकडून सात ते आठ उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची असलेली गर्दी पाहून जठार यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचा विचार हा वरिष्ठ पातळीवर होईल, असे जाहीर केले आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आठ तारीखपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत कोणीही अर्ज भरला नव्हता. मात्र सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व सध्याच्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पहिल्यापासूनच भाजपकडून किंवा अपक्ष असे निवडणूक रिंगणात उतरण्याची जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केला.

पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असेही कोरगावकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपनध्ये बंडखोरी अटळ झाली असून आता याचा निर्णय पक्षीयस्तरावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र यापूर्वीही कोरगावकर यांनी नगरसेवकपदासाठी भाजपमधून अर्ज दाखल केला होता. मात्र, आयत्यावेळी त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्या निवडून आल्या होत्या. तसेच मागील तीन वर्षाच्या सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग