शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याच्या मृत्यूप्रकरणी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांची बदली; येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात हजर होण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 22:50 IST

कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची अखेर पुणे येथील येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहात  देवगड येथील राजेंद्र गावकर या कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची अखेर पुणे येथील येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी कारागृह प्रशासनास प्राप्त झाले असून, पाटील यांना आपला कार्यभार प्रभारी अधिकार्‍यांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

सावंतवाडी कारागृहातील  कैदी राजेंद्र गावकर यांचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता, हा मृत्यू कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची चर्चा सर्वत्र होती. या प्रकरणी पोलीस ही कसून चौकशी करत होते. मध्यंतरी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी ही सावंतवाडी कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची तीन दिवस कसून चौकशी केली होती. तसेच गावकर यांच शवविच्छेदन करणारे कोल्हापूर येथील वैद्यकीय पथकही गावकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात आले होते. त्यामुळे सावंतवाडी कारागृहाचे कामकाज चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.कारागृह अधीक्षकांवर कारवाई होणार हे निश्चित होते. त्यातच सोमवारी कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांची पुणे येथील येरवडा कारागृहात प्रशिक्षण केंद्रात बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले असून, आपला कार्यभार प्रभारी अधिकार्‍याकडे देऊन लागलीच पुणे येथे हजर होण्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, तसे पत्र आल्याचे मान्य केले आहे.