शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात सावंतवाडी पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:19 IST

कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृह प्रवासी संघटनेची बैठक आयोजित करून यावरचा निर्णय घेण्यात येणार असेही सावंत यांनी सांगितले.

ठळक मुद्देअन्यथा.... रेलरोको शिवाय पर्याय नाही : डी के सावंत यांचा इशारा रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी निर्णय

सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्गकोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृह प्रवासी संघटनेची बैठक आयोजित करून यावरचा निर्णय घेण्यात येणार असेही सावंत यांनी सांगितले.ते म्हणाले कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून २२ वर्षे झाली आहे. मात्र येथील प्रवाशांच्या आणि चाकरमान्यांच्या नाराजी आहे. प्रवाशांची ससेहोलपट होत आहे. कोकण रेल्वे असताना अत्यंत वाईट पद्धतीने मेंढरासारखे प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे विविध मागण्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे मांडण्यात आल्या होत्या.

परंतु या मागण्यांची पूर्तता अद्याप पर्यंत झालेले नाही त्यामुळे आता आंदोलन निश्चित आहे. याबाबत पुढील ध्येयधोरण ठरवण्यासाठी ३० तारखेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच त्या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग