शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रमोद जठारांनी 'त्यावेळी' राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय? सतीश सावंतांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:45 IST

प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी

कणकवली : प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे. राणे यांचे समर्थन ते आता करीत आहेत. मात्र, राणे भाजप मध्ये येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले आहे. भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी नितेश राणेंवर सूडबुद्धीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेला सतीश सावंत यांनी कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड , शहरप्रमुख चंद्रशेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. मात्र, आता प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत. 

२०१४ च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हशी जठार विसरले आहेत का? आता खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार हे राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर १८ डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण गेले. 

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. संतोष परबवर हल्ला होऊन त्याला १८ टाके पडले. मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी त्याबाबत परबला फक्त खरचटले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे नितेश राणेंना आता ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जरी मी त्यावेळी राणेंसोबत होतो तरी अनधिकृत आंदोलनांच्यावेळी मी त्यांची साथ दिली नाही.भाजप तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक या सारख्या प्रकरणात मी त्यांच्या सोबत नव्हतो. जठार यांनी राणे विरोधात असताना त्यांच्यावर त्यावेळी केलेले आरोप खोटे होते काय ? तसे असेल तर आता जठार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही सतीश सावंत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग