शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जोधपूर विद्यापीठातील राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत सतीश लळीत यांचा कातळशिल्पांचा शोधनिबंध

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 2, 2023 12:58 IST

लळीत गेली २३ वर्षे कातळशिल्प या विषयाचा अभ्यास करीत असुन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कातळशिल्प स्थाने प्रकाशात आणली आहेत

सिंधुदुर्ग : राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत 'कोकणातील कातळशिल्पे' या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी निवृत्त माहिती उपसंचालक व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात ही पाचवी 'आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी परिषद' होणार आहे.जय नारायण व्यास विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि राजस्थानमधील 'आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस' यांनी संयुक्तपणे या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. 'आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस'चे अध्यक्ष प्रा. बी. एल. भादोनी आणि विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. भगवान सिंह शेखावत यांनी एका पत्राद्वारे श्री. लळीत यांना या परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. या परिषदेत देशाच्या विविध भागातील पुरातत्वशास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक आपले संशोधन शोधनिबंधाद्वारे सादर करणार आहेत. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठाची स्थापना १९६२ साली झाली. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन् यांच्याहस्ते उद्घाटन झालेले हे विद्यापीठ राजस्थानमधील अग्रगण्य विद्यापीठ आहे.लळीत गेली २३ वर्षे कातळशिल्प या विषयाचा अभ्यास करीत असुन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कातळशिल्प स्थाने प्रकाशात आणली आहेत. 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हा त्यांचा संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध झाला असुन त्यांनी याआधीही अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये या विषयावर शोधप्रबंध सादर केले आहेत. मार्च २०२२ मध्ये 'युनेस्को'च्या सांस्कृतिक समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपीसह गोव्यातील उसगाळीमळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सात कातळशिल्प स्थानांचा समावेश 'जागतिक वारसा स्थळां'च्या प्राथमिक यादीत केला आहे. यामुळे देशातील पुरातत्वक्षेत्रात कोकणातील कातळशिल्पांबाबत कुतुहल वाढले आहे.जोधपूर येथील या राष्ट्रीय परिषदेत लळीत ' पेट्रोग्लिफ्स ऑफ कोकण' म्हणजे 'कोकणातील कातळशिल्पे' हा शोधनिबंध आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील कातळशिल्पांचे सादरीकरण करतील. कर्नाटक आणि केरळमधील कातळशिल्पांचा धावता आढावाही त्यांनी आपल्या शोधनिबंधात घेतला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग