शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सतीश लळीत उद्घाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:00 IST

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने दि. १ व २ फेब्रुवारी रोजी नाटे (राजापूर) येथे आयोजित केलेल्या सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माध्यमकर्मी व घुंगुरकाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सतीश लळीत उद्घाटक नाटे (राजापूर) येथे १ व २ फेब्रुवारीला भरणार साहित्यमेळा

ओरोस: राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने दि. १ व २ फेब्रुवारी रोजी नाटे (राजापूर) येथे आयोजित केलेल्या सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माध्यमकर्मी व घुंगुरकाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यशवंतगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या निसर्गरम्य गावात होणाऱ्या या साहित्य मेळ्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार  वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गवाणकर यांची निवड यापुर्वीच जाहीर झाली आहे.१९५३ साली स्थापन झालेला राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व नाटे ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अघ्यक्ष सुभाष लाड, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, अशोक कांबळे, सरचिटणीस स्नेहल आयरे, विजय हटकर, नाटेच्या सरपंच योगिता बांदकर आदि प्रयत्नशील आहेत.

संमेलनात सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर (साहित्यातील साचलेपणाची कोंडी फुटु दे), प्रा. डॉ. राहुल मराठे (ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज), वृंदा कांबळी (कथाकथन: तंत्र आणि मंत्र), रविराज पराडकर (शिवछत्रपती आणि तळकोकण) सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. अलका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनस्थळाला दत्ताराम केशव पावसकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, कविसंमेलन, विविध प्रदर्शने, व्याख्याने, लोककलादर्शन, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. संमेलनाचे उद्घाटन १ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. संमेलनाला रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग