शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साटेली-भेडशी कॉजवे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:21 IST

सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

ठळक मुद्देसाटेली-भेडशी कॉजवे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार

दोडामार्ग : सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले. बुधवारीही पावसाची संततधार कायम होती. ठिकठिकाणचे नदी-नाले भरून वाहत आहेत. दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गावरील साटेली-भेडशी येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते.दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी पावसाने जोर धरला. पावसाची संततधार बुधवारीही कायम होती. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने जोर धरल्याने तिलारी-दोडामार्ग महामार्गावरील साटेली-भेडशी येथील नदीवरील कॉजवे पाण्याखाली घेला होता. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली. तसेच येळपय नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरील रस्त्याच्या कडेचे गटार खुले नसल्याने पाणी थेट रस्त्यावर आले. रस्त्याची अवस्था तलावासारखी झाल्याने वाहने चालविताना मोठा अडथळा निर्माण झाला होता. पावसाने केलेली ही जोरदार सुरुवात पाहता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्यावर्षी अशीच पावसाने सुरुवात केली होती. त्यामुळे तिलारी नदीला पुर येऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती पुन: उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.विजेचा खेळखंडोबाजोरदार लागणाऱ्या पावसामुळे अनेक भागात बुधवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात मोबाईल नेटवर्कची समस्यादेखील गंभीर झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग