शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा संगणकीकरणाचा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:02 IST

आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्दे२२ सप्टेंबरपासुन कणकवलीसह सिंधुदुर्गातील मुख्य सर्व्हर बंद कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त, तलाठयांचे कामकाज झाले ठप्पजनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाजाची मागणी

कणकवली ,दि. ०२ : आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबारा दुरुस्त, नवीन सातबारासह होणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०१७ पासुन मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे आॅनलाईन कार्यप्रणाली उघडण्यास विलंब लागत आहे.

फक्त सातबारा जरी पक्षकाराला द्यावयाचा असल्यास तब्बल दिड ते दोन तास जात आहेत. तर इतर कामे करण्यासाठी एनआयसीची आॅनलाईन कार्यप्रणाली पुर्णत: नादुरुस्त असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेला विविध शासकीय, वैयक्तिक कामांसाठी लागणारे सातबारा, फेरफार नोंदी, सातबारात बदल यासह अन्य महसुल विषयक कामे होत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहेत.

तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे संबंधीत अधिकाऱ्यांकडुन पाठपुरावा करुन देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्याची चर्चा महसुल विभागात आहे.

एकीकडे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे विविध कामकाजाचा बोजा असतानाच आॅनलाईन फीडींगचे काम दिल्यामुळे दररोजच्या कामकाजावर परिणाम झाला होता. गेले दोन वर्षे सर्वसामान्य पक्षकारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आॅनलाईन सातबारा खरेदी-विक्री या प्रक्रियेत वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासुन बंद असलेल्या सर्व्हरमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने महसुल विभागातील या मोठा अडचणीचा विषय बनलेल्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.आॅफलाईन कामकाजाची मागणीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅनलाईन सातबारा, फेरफार नोंदी व इतर दस्त स्कॅनिंग करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वर्षोनुवर्षे आॅनलाईन प्रक्रियेचे कामकाज प्रलंबीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, महसुल अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आॅनलाईन प्रक्रिया राबविताना जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आॅफलाईन कामकाज करावे. तसेच आॅनलाईनचे कामकाज सोईने करुन १०० टक्के संगणीकृत कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतुन केली जात आहे. 

टॅग्स :talukaतालुकाonlineऑनलाइन