शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संतोष परब हल्ला प्रकरण : जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 17:41 IST

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होऊ नये यासाठी जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी ...

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होऊ नये यासाठी जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काम पाहिले. तर आमदार नितेश राणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे.कणकवली शहरातील नरडवे तिठ्यावर १८ डिसेंबरला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी चेतन पवार, करण कांबळे, अनिल नक्ता, करण कांबळे, दीपक वाघोळे, सचिन सातपुते या सहा आरोपींना अटक केली आहे. यातील सचिन सातपुते याला न्यायालयीन कोठडी झाली आहे. तर धीरज परब, ज्ञानेश्वर माऊली असे दोन आरोपी फरारी आहेत. याशिवाय भाजप आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर ७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तर जिल्हा बँक संचालक मनीष दळवी व आमदार राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांनी सुद्धा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.यातील मनीष दळवी यांच्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे विशेष वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना मनीष दळवी यांचा आरोपींशी मोबाईलद्वारे संवाद झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने मनीष दळवी यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे. तर राकेश परब यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही. ती ११ जानेवारीला होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी