शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संजू परब यांचे राणेंवर बेगडी प्रेम :रुपेश राऊळ, साक्षीदार असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:17 IST

Narayan Rane Sindhudurgnews- संजू परब यांंनी शिवसेनेत प्रवेश करताना खासदार विनायक राऊत यांच्या घरी राणेंची जंत्री वाचली होती. त्याचा प्रमुख साक्षीदार मी स्वत: असून, वेळ पडल्यास आम्ही हे उघड करू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. राणेंवर बेगडी प्रेम करणारे परब हे खरे नौटंकीबाज आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देसंजू परब यांचे राणेंवर बेगडी प्रेम :रुपेश राऊळसाक्षीदार असल्याचा दावा

सावंतवाडी : राणेंना कोणीही काही म्हटले तरी यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे सांंगणाऱ्या सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांंनी शिवसेनेत प्रवेश करताना खासदार विनायक राऊत यांच्या घरी राणेंची जंत्री वाचली होती. त्याचा प्रमुख साक्षीदार मी स्वत: असून, वेळ पडल्यास आम्ही हे उघड करू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. राणेंवर बेगडी प्रेम करणारे परब हे खरे नौटंकीबाज आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, राघोजी सावंत, अशोक दळवी, सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.राऊळ म्हणाले, राजन तेली यांनी शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे ते प्रथम पहावे. नंतर आमच्यावर टीका करावी. सावंतवाडी नगराध्यक्षांच्या खुर्चीबद्दल एक आदर होता तो परब घालवून बसले आहेत. सावंतवाडीत कधीही हाणामारीची भाषा झाली नाही. पण ती परब यांनी केली. जर तुम्हांला पुतळाच जाळायचा होता तर गांधी चौकात जाळायचा. सालईवाडा येथे कशाला गेला? असा सवालही राऊळ यांनी केला आहे.परब हे माझी नेमळे आणि मळगाव ग्रामपंचायत गेली असे सांगत आहेत. पण त्यांच्याकडे तळवडे तसेच इन्सुलीची जबाबदारी दिली होती. ते निरीक्षक होते. मग या दोन्ही ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव का झाला असा सवालही राऊळ यांनी केला आहे. आम्ही नक्की पराभवाचे आत्मपरीक्षण करू, असेही यावेळी राऊळ म्हणाले.तर जंत्रीच वाचून दाखवूज्या व्यक्तीच्या पायाला हात लावला त्याचाच पुतळा जाळण्यासाठी जाता म्हणजे तुमच्यावर कोणते संस्कार झाले हे आम्हांला कळते. परब हे जर राणेंवर कुणीही काही बोलले तर सोडणार नाही अशी भाषा वापरतात. पण याच परब यांनी खासदार राऊत यांच्या घरी जाऊन राणेंची जंत्री वाचली होती. त्यावेळी त्यांचे राणेंवर असलेले बेगडी प्रेम कुठे गेले होते? परब हे नौटंकीबाज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. जर ते यापुढे शिवसेनेवर अशीच टीका करीत राहिले तर सर्व जंत्रीच वाचून दाखवू, असा इशाराही राऊळ यांनी दिला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग