शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:58 IST

culture Sindhudurg : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 26 मे रोजीच्या 76 व्या जयंतीनिमित्त स्क्रिबलिंग मधून त्यांचे चित्र रेखाटून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी हे चित्र तयार केले असून या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे. 

ठळक मुद्दे डॉ.संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली शब्दातून चित्रे काढणारा अवलिया चित्रकार

निकेत पावसकर सिंधुदुर्ग : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 26 मे रोजीच्या 76 व्या जयंतीनिमित्त स्क्रिबलिंग मधून त्यांचे चित्र रेखाटून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी हे चित्र तयार केले असून या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्हयातील डाकेवाडी-काळगांव ता.पाटण येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ. संदीप डाकवे आपल्या जादुई चित्रकलेच्या माध्यमातून शब्दांची गुंफण करत शब्दातून विविध चित्रे साकारत आहेत. आतापर्यंत त्यांनी संत गाडगेबाबा, गौतम बुध्द, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा), अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, रा.गो.प्रभुणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खा.श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेते भरत जाधव इ.सह अनेकांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.डॉ.संदीप डाकवे यांनी शब्दचित्राबरोबर खडूतून अष्टविनायक, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, अक्षरगणेशा, व्यंगचित्रे, पोस्टर रेखाटन, पेपर कटींग आर्ट, रांगोळी, पुस्तकांची मुखपृष्ठे, कॅलिग्राफी, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश इ.कलात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच 7000 हून अधिक विविध क्षेत्रातील दिग्गजांना त्यांची हुबेहुब चित्रे काढत सरप्राईज भेटी दिली आहेत. त्यांच्या या छंदाची नोंद ह्यइंडिया बुक आॅफ रेकॉर्डह्ण, या पुस्तकात दोनदा तरहायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकॉर्ड मध्ये एकदा झाली आहे.डॉ.डाकवे यांना चित्रकलेबरोबरच लेखनाचा छंद असून त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यात आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांचा शासन दरबारी 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.केवळ चित्रे न रेखाटता यामधून मिळालेल्या मानधनातून नाम फाऊंडेशन 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील 5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 7 हजार, ईशिता पाचुपते 5 हजार,  शैक्षणिक फीसाठी 6 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार अशी सुमारे 85 हजाराची मदत केली आहे.याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्थापन केलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट मधून सुमारे लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य वितरित केले आहे.कोविड 19 च्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशमुख कुटूंबियांकडून सामुदायिक आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन देशमुख कुटूंबियांकडून केले होते. त्या अनुषंगाने डॉ.डाकवे यांनी स्क्रिबलिंग मधून देशमुख यांचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे. त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग