शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती

By सुधीर राणे | Updated: May 5, 2023 15:57 IST

बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे दिले निर्देश

कणकवली : कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणारा पूल लवकरच उभारला जाणार आहे. जानवली नदीवरील या पुलाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून पाठवा, असे निर्देश आम्ही बांधकाम विभागाला दिले आहेत. तर पुढील वर्षभरात कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित होईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.     मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी कणकवली नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत,संजय कामतेकर,महेश सावंत तसेच अन्य नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कणकवली व जानवली ही गावे जोडण्यासाठी जानवली नदीवर गणपती सान्याजवळ मोठा पूल व्हावा. अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता लवकरच पूर्णत्वास जाईल. बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत.कोकणात येणारा चाकरमानी किंवा पर्यटक यांचा प्रवास सुखाचा व्हावा. मोठ्या शहरांच्या धर्तीवर कोकणातही सुविधा मिळाव्यात यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्याअनुषंगाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्तेही चांगल्या दर्जाचे तयार केले जाणार आहेत. सिंधुदुर्गातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे अद्ययावतीकरण होणार आहे.यामध्ये कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून पुढील वर्षापर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रस्ते आणि पर्यटन अनुषांगिक कामांच्या पूर्ततेला प्राधान्य देण्यात आल्याची माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण