शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोध: भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:29 IST

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी समिता संतोष कुडाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोधवाभवे-वैभववाडी नगरपंचायत : भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी समिता संतोष कुडाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.अक्षता जैतापकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे कुडाळकर यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे कुडाळकर यांची निवड निश्चित झाली होती. प्रांताधिकारी राजमाने यांनी शुक्रवारी नगराध्यक्षपदी कुडाळकर यांच्या निवडीची घोषणा केली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, मधुसूदन बांदिवडेकर, भालचंद्र साठे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण व आरोग्य सभापती सुचित्रा कदम, नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संतोष माईणकर, स्वप्नील ईस्वलकर, सज्जन रावराणे, दीपा गजोबार, शोभा लसणे, संपदा राणे, रवींद्र तांबे, हुसेन लांजेकर उपस्थित होते.कुडाळकर शहराच्या पाचव्या नगराध्यक्ष!वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचा हा पहिलाच पंचवार्षिक कालावधी आहे. या काळात पहिल्या अडीच वर्षात रवींद्र रावराणे आणि त्यानंतर संजय चव्हाण यांनी नगराध्यक्ष पद भूषविले. नंतरच्या अडीच वर्षांच्या काळात जवळपास दीड वर्ष दीपा गजोबार, त्यानंतर सहा महिने अक्षता जैतापकर आणि आता समिता कुडाळकर यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पहिल्याच पंचवार्षिकमध्ये कुडाळकर या पाचव्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. नगरपंचायतीची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग