शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जीवितास धोका झाल्यास गप्प बसणार नाही :समीर नलावडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:39 IST

कणकवली : शहरात एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सवेलची भिंत धोकादायक बनली आहे. शहरातील नाल्याची कामे अर्धवट असल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शहरातील पदपथ बंद आहेत. सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचत आहे. अशा अनेक समस्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांसमोर रविवारी मांडल्या.

ठळक मुद्देजीवितास धोका झाल्यास गप्प बसणार नाही :समीर नलावडे यांचा इशारा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत कणकवलीत आढावा बैठक

कणकवली : शहरात एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सवेलची भिंत धोकादायक बनली आहे. शहरातील नाल्याची कामे अर्धवट असल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शहरातील पदपथ बंद आहेत. सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचत आहे. अशा अनेक समस्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांसमोर रविवारी मांडल्या.

यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या ८ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास व जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास नगरसेवकांना घेऊन रस्त्यावर उतरू. आता गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात महामार्ग ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांचे अधिकारी उदयसिंह चौधरी, परिहार यांच्यासमवेत आढावा बैठक रविवारी झाली. यावेळी नगरपंचायतीचे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अ‍ॅड. विराज भोसले, माजी नगरसेवक अजय गांगण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, राजन परब, राजू गवाणकर, दत्ता शंकरदास आदी नागरिक उपस्थित आहे.यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयापासून जवळच रेवडेकर बिल्डींगच्या समोर नाला आहे. तिथे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी कठडा बनविलेला नाही. या सर्व कामांची आपण संयुक्त पाहणी करूया, असे नगराध्यक्षांनी सांगितले.कामे वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनकणकवलीलगतच्या दोन्ही नद्यांच्या पुलांच्यामध्ये चौपदरीकरण कामाची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या केव्हा सोडविणार ? शहरातील नाल्यांच्या ठिकाणी छोट्या मोऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक घरात व दुकानांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न समीर नलावडे यांनी विचारला.जानवली नदीवरील पुलाचा स्लॅब केव्हा घातला ? अशी विचारणा नलावडे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावर ४ जून रोजी स्लॅब घातला असून त्या पुलाचे काम व्यवस्थित करू, असे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.येत्या ८ दिवसांत अन्य कामे करतो. तर छोटी कामे दोन दिवसांत होतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कामे वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग