शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

By admin | Updated: July 10, 2016 23:50 IST

नागरिकांना त्रास : नगरपंचायतीचे धोरण कागदावरच; अपघाताची शक्यता

वैभववाडी : बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने धोरण ठरविले खरे! परंतु, संभाजी चौकाकडे पाहिल्यावर नगरपंचायतीचे ‘बॅनर धोरण’ कागदावरच राहिल्याचा प्रत्यय सध्या नागरिकांना येत आहे. सुशोभित केलेल्या चौकाला बॅनरचा विळखा पडला असल्याने ‘संभाजी’ चौकाऐवजी ‘बॅनर’ चौक म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले असून, या बॅनर्समुळे चौकात अपघाताची शक्यता वाढली आहे. नगरपंचायतीचा कारभार हाती घेताना नव्या कारभाऱ्यांनी कालमर्यादा ठरवून आकारमानानुसार कर भरुन घेऊन बॅनर लावण्याची परवानगी द्यावी. तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा जागी बॅनरला परवानगी देऊ नये. बॅनर लावणाऱ्यांनी निर्धारित वेळेत ते काढून नेले नाहीत तर संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशा स्वरूपाचे धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासूनच या धोरणाची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. चौकातील पूर्वीच्या कठड्याच्या जागी नवीन कठडा उभारुन उंची वाढविण्यात आली. तसेच काही प्रमाणात त्याचे सुशोभिकरणही झाले. मात्र, त्यानंतर चौकाचा कठडा बॅनरसाठी अतिशय मोक्याचे ठिकाण बनला आहे. मध्यंतरी संभाजी चौकात महाराणा प्रतापसिंहांचा पुतळा उभारण्यावरुन उठलेल्या वादळानंतर या चौकात बॅनर लावूच नयेत, अशी भूमिका घेतली गेली होती. मात्र, तीही तकलादू ठरली. सध्या संपूर्ण संभाजी चौकाला चहुबाजूंनी बॅनरचा विळखा पडलेला दिसून येतो. या बॅनरमधून नगरपंचायतीला कर किती मिळाला. हा मुद्दा निराळाच आहे. विजयदुर्ग - कोल्हापूर व फोंडा -उंबर्डे या मार्गांचा संभाजी चौक दुभाजक आहे. हे दोन्ही रस्ते सतत वर्दळीचे आहेत. चौकातील बॅनरमुळे पलिकडच्या रस्त्यावरील वाहनांचा मुळीच अंदाज येत नाही. दोन रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या चौकात बॅनरला परवानगी देताना नगरपंचायतीने नागरिकांच्या आणि वाहनांच्याही सुरक्षिततेचा विचार करायला हवा. परंतु, संभाजी चौकातील सद्यस्थिती पाहता नगरपंचायतीचे बॅनर विषयक धोरण कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच रिलायन्सच्या केबलसाठी खोदलेल्या चराचा अडथळा आहेच. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना चौकातील बॅनरचा नाहक त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) हा नगरपंचायतीचा निष्काळजीपणा बॅनरला परवानगी देताना कालमर्यादेची अट पाळणे ही जशी बॅनर लावणाऱ्यांची जबाबदारी आहे. तशीच ती मुदतीनंतर काढून टाकण्याची जबाबदारी नगरपंचायतीचीही आहे. संभाजी चौकात सध्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश, वाढदिवसांच्या शुभेच्छा, गुणवंतांचे अभिनंदन, मोर्चे, जयंत्या आदींचे बॅनर लागलेले आहेत. त्यातील बहुतांश बॅनर कालबाह्य झालेले आहेत. तरीही या बॅनर्सचा संभाजी चौकाला विळखा कायम आहे. मात्र, यातून नगरपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने चौकात लागणाऱ्या बॅनरवर निर्बंध घातले नाहीत; तर कालांतराने संभाजी चौकाची ‘बॅनर चौक’ अशी नवी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.