शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मान्सूनपूर्व पावसाने साळिस्ते गाव तीन दिवस अंधारात, ग्रामस्थांची वीज कार्यालयात धाव

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 22, 2024 18:38 IST

वीज वितरण कार्यालयातून ग्रामस्थ चर्चा करून बाहेर पडताच काही वेळातच गावात पुन्हा वीज पुरवठा सुरळीत

नीकेत पावसकरतळेरे : सध्या सायंकाळी पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र वीज समस्या जाणवत आहे. कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावात गेले तीन दिवस वीजच गायब झाली असून, संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी तळेरे येथील वीज कार्यालयात धडक दिली आणि वीज समस्येबाबत विचारणा केली. मात्र, काही काळातच पर्यायीव्यवस्था करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, गेले अनेक दिवस वळीव पावसामुळे सर्वत्र नुकसान होत आहे, तर अनेक ठिकाणी वीज समस्या जाणवत आहे. साळिस्ते गावातही पावसामुळे वीज समस्या निर्माण झाली. त्यामुळे गेले तीन दिवस गावात वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे सार्वजनिक नळाचे पाणी येऊ शकलेले नाही. शिवाय, पाऊस जरी पडत असला तरीदेखील उन्हाचे चटके कमी झालेले नाहीत. वीज नसल्याने अनेक गैरसोय होऊ लागली.या समस्येबाबत संतप्त नागरिकांनी बुधवारी सकाळी तळेरे येथील वीज वितरण कार्यालयात भेट देऊन याबाबत विचारणा केली. यावेळी महावितरण विभागाचे अभियंते पाटील व उपअभियंता गावकर उपस्थित होते. साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांनी वीज नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, तसेच सोसावे लागणारे हाल मांडले आणि साळिस्ते गावाला पूर्वीप्रमाणेच खारेपाटणवरून वीजपुरवठा करण्यात यावा, संपूर्ण गावातील विद्युत पोल, डीपी, लाइन यांचा पावसाळ्यात वीज समस्या होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात यावी. याबाबत चर्चा करण्यात आली.महावितरण अभियंते पाटील व गावकर यांनी सर्व समस्यांची हमी घेतली व लवकरच साळिस्ते गावातील वीज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, माजी सरपंच उदय बारस्कर, माजी सरपंच अनंत बारस्कर, माजी उपसरपंच बाळा पाटील, मंगेश कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा विधानसभा क्षेत्र सोशल मीडियाप्रमुख मयूरेश लिंगायत, पप्या मेस्री, बबन कांजीर, श्रीधर कांबळे, जगदीश कुलकर्णी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

अवघ्या काही वेळात वीजतळेरे वीज वितरण कार्यालयातून ग्रामस्थ चर्चा करून बाहेर पडताच काही वेळातच साळिस्ते गावात पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसelectricityवीज