शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : औषधे लावून फळांची विक्री सुरू, सावंतवाडीतील प्रकार : भोगटेकडून कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:55 IST

सावंतवाडी बाजारपेठेत केमिकलद्वारे पाठविली जाणारी केळी तसेच फळांबाबत लोकमतने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत येथील सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या केमिकलचा नायनाट करुन संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देऔषधे लावून फळांची विक्री सुरू, सावंतवाडीतील प्रकारभोगटेकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी बाजारपेठेत केमिकलद्वारे पाठविली जाणारी केळी तसेच फळांबाबत लोकमतने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत येथील सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या केमिकलचा नायनाट करुन संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणारी केळी ही नैसर्गिकरित्या न पिकविता ती केमिकलव्दारे पिकवून विकली जातात. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते.

दरम्यान, पालिका प्रशासनानेही याची दखल घेतली असून माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनीही या प्रकाराबाबत आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्न औषध प्रशासन व पोलीस अधीक्षक, नगरपालिका प्रशासन यांच्याजवळ निवेदनाव्दारे तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात येत्या गणेश उत्सव काळात केमिकलयुक्त केळी व फळांचा सर्रास वापर होऊ शकतो.

यात नागरिकांची फसवणूक होऊन अशा फळांपासून भयंकर रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे अशा केमिकलद्वारे केळीवर प्रक्रिया करणाऱ्या विक्रेत्यांची शोध मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांनीही अशी केळी खरेदीवर बहिष्कार घालावा. शोध मोहीम राबविताना योग्य यंत्रणा वापरण्यात यावी, अशी मागणीही भोगटे यांनी केली आहे.

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग