शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

साक्षी पिंगुळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम, बारावी निकाल : कुडाळ कॉलेजची विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:32 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. कुडाळ कॉलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी साक्षी पिंगुळकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्देसाक्षी पिंगुळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम बारावी निकाल : कुडाळ कॉलेजची विद्यार्थिनी

सिंधुदुर्ग : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. कुडाळ कॉलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी साक्षी पिंगुळकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शाखेच्या प्रणिता राऊळ हिने ९४.१५ टक्के गुण मिळवित द्वितीय व कुडाळ हायस्कूलच्या वाणिज्य शाखेच्या मृणाल सरवटे (९३.३८) हिने तृतीय क्रमांक मिळविला.कणकवली कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या जुही वालावलकर हिने (९३.२३ टक्के) प्राप्त करीत चतुर्थ तर सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची तनया वाडकर हिने (९३.०७) पाचवा क्रमांक पटकाविला.बुधवारी दुपारी १ वाजल्यानंतर शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनच्या आधारे आपला निकाल पाहिला.बारावीच्या निकालाची धागधूग अखेर संपली असून आता दहावीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपल्या यशाचा झेंडा कायम ठेवल्याने त्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHSC Result 2018बारावी निकाल २०१८