शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रशियन पर्यटकांच्या दुचाकीस गव्याची धडक, काळ आला होता..; सावंतवाडी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:01 IST

सावंतवाडी तालुक्यात गव्यांच्या हल्ल्यात वाढ

सावंतवाडी : गोव्याहून सिंधुदुर्गातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोघा रशियन पर्यटकांवर कलंबिस्त शिरशिंगे सिमेवर चक्क गव्याने हल्याचा प्रयत्न केला. पण देव बलवत्तर म्हणून हे पर्यटक थोडक्यात बचावले. यात त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.मनुष्यवस्थेत सध्या गव्यांचा वावर वाढला आहे अनेक ठिकाणी गवे थेट मनुष्यावर हल्ला करत आहेत. सावंतवाडी तालुक्यात तर मागील महिन्याभरात चार ते पाच ठिकाणी गव्यांनी माणसांवर हल्ले केले आहेत. हा प्रकार ताजा असतानाच आज कलंबिस्त शिरशिंगे सिमेवर गव्यांनी विदेशी पर्यटकांना आपले लक्ष्य केले.दोन रशियन पर्यटक हे गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कलंबिस्त शिरशिंगे भागात आले होते. त्याचवेळी रस्त्यावरून जाताना अचानक त्यांच्यासमोर दोन गवे आले आणि त्यांच्या दुचाकीला धडक दिली.ही धडक एवढी जबरदस्त होती कि हे रशियन पर्यटक थोडक्यात बचावले. पण ते खाली कोसळून जखमी झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांकडून धावाधाव करून त्यांना अधिक उपचारासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून सावंतवाडी येथे अधिक उपचारासाठी आणण्यात आले होते. या पर्यटकांची सध्या प्रकृती स्थिर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. वनविभागासमोर आव्हान

  • गव्यांनी विदेशी पर्यटकांना लक्ष्य केल्याने वनविभागासमोर आता आव्हान उभे राहिले आहे.
  • कारण मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या काळात पर्यटक आजूबाजूच्या गावात पर्यटनासाठी आल्यावर त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले झाल्यास पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास धजावणार नाहीत. 
  • त्यामुळे वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे. वनविभागाने यावर कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागSawantwadiसावंतवाडी