शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आरोंदा परिसरात अनधिकृत वास्तव्य, रशियन पर्यटकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:23 IST

अमली पदार्थ विक्रीचा संशय

सावंतवाडी : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करत असलेल्या युरी वॅल्डीमोरीविझ मोजको (४४, रा. रशिया) या रशियन पर्यटकाला अमलीपदार्थांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून सावंतवाडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ आढळून आले नसल्याने पोलिसांकडून त्याला आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पोलिस तपासणीवेळी कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. ही कारवाई पोलिसांकडून मंगळवारी सकाळी करण्यात आली असून, युरी याला ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.याबाबत माहिती अशी युरी हा रशियन पर्यटक गोवा-हरमल येथे आला होता. त्याला महाराष्ट्रातील आरोंदा हे गाव जवळ असल्याने तसेच शिरोडा, वेळागर, रेड्डी येथील बीच जवळ असल्याने त्याचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला होता. आरोंदा येथील स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आरोंदा येथे गेले. त्यांनी या रशियन पर्यटकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो आरोंदा- रेडकरवाडी येथे अमलीपदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच पोलिसांकडून छापा टाकण्यात आला होता.परंतु त्याच्याकडे काहीच आढळले नाही. त्यामुळे त्याच्यावर अनधिकृतरीत्या वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खंदरकर, पंकज शिंदे, हवालदार महेश अरवारी, पोलिस महेश परब, सुरेश पाटील आदींकडून करण्यात आली.