शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच..

By अनंत खं.जाधव | Updated: March 29, 2023 16:49 IST

केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध 

सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावर असलेलाच आठवडा बाजार योग्य आहे. त्यामुळे बाजाराचे अन्यत्र स्थलांतर करण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. हा आठवडा बाजार हलवू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान शहरातील अन्य विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरून मतदारांची नजर हटविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी बाजार स्थलांतरांवरून वाद निर्माण केला असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. ते आज, बुधवारी सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आठवडा बाजार हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश मंत्री केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊळ बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, योगेश नाईक, गुणाजी गावडे, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, साधना कळंगुटकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, फिलिप्स रोड्रिक्स उपस्थित होते.राऊळ म्हणाले, शहरातील मल्टीस्पेशालिटी, बस स्थानक असे प्रश्न प्रलंबित असताना केसरकारांनी आठवडा बाजार हलवून नवीन वाद निर्माण केला आहे. बाजार हलवताना कोणत्याही नागरिकांना विचारात घेतले नाही. अनेकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बाजार योग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार कुठेही हलविण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.ज्या ठिकाणी आपण बाजार नेतो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले त्या ठिकाणी साधी शौचालयाची व्यवस्था नाही. चार ठिकाणी बाजार हलवल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करू नये. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमची भूमिका कळविणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही राऊळ यांनी यावेळी केली.केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध मंत्री दीपक केसरकर हे घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून ते फक्त घोषणाच करतात आता तर मल्टीस्पेशालिटीला ८० टक्के परवानगी मिळणे सोपे झाले असे सांगतात. मग तीन वर्षापूर्वी भूमिपूजन कशासाठी केले ही जनतेची फसवणूक नाही का? असा सवालही राऊळ यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडी