शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आचरा येथील डाळपस्वारीचा शाही थाट

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

शेकडो भाविकांची उपस्थिती : ‘काळकाय’ देवीचे आश्वासक अभिवचन

आचरा : आचरा गावच्या रयतेची सुखदु:खे जाणण्यासाठी आठ दिवस डाळपस्वारीनिमित्त बाहेर पडलेली श्री देव रामेश्वराची स्वारी मंगळवारी रात्री उशिरा रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून पारंपरिक कर्तव्ये पार पाडत गांगेश्वर मंदिरात विसावली. शेकडो भाविकांच्या साथीने आणि केवळ तीन वर्षांनी बोलणाऱ्या ‘काळकाय’ देवीच्या आश्वासक अभिवचनात या डाळपस्वारीची सांगता झाली.दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळी डाळपस्वारीच्या फेरीला सुरुवात झाली. गिरावळी मंदिरातून आचरा बाजारपेठेत आगमन झालेल्या ‘श्रीं’च्या स्वारीचे स्वागत बाजारपेठवासीय, रिक्षा संघटनांनी जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीत केले. फुरसाई मंदिरमार्गे संपूर्ण बाजारपेठेतून दुपारी श्रींच्या स्वारीचे आचरा तिठा येथे आगमन झाले.संध्याकाळी नागोचीवाडी ब्राह्मणदेव येथे भाविकांची गाऱ्हाणी, ओट्या स्वीकारत आगमन झाले. येथील डाळप पूर्ण करत काही काळ विसावली. संध्याकाळी उशिरा येथून माळावरील पारंपरिक वाटेने पारवाडी ब्राह्मणदेव मंदिराकडे आली.यावेळी ‘श्रीं’च्या स्वारीचे आणि सोबत आलेल्या शेकडो भाविकांचे पारवाडी ब्राह्मणदेव मंडळातर्फे जल्लोषात स्वागत केले. डाळप पूर्ण करून काही काळ ब्राह्मणदेव मंदिरात स्वारी विसावली. नंतर ‘श्रीं’ची स्वारी भाविकांची गाऱ्हाणी ऐकत रात्री उशिरा मृदंगाच्या तालावर रामेश्वर मंदिराकडे परतली. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.अफाट जनसागराला सोबत घेत वाद्यांच्या गजरात ललकारीने रामेश्वर मंदिराला पावलांच्या साथीने प्रदक्षिणा घालत गांगेश्वर मंदिराकडे विसावली. मंगळवारी बाजारपेठेत तसेच रिक्षा संघटना यांच्याकडून भाविकांना अल्पोपहाराची व जेवणाची व्यवस्था केली. तसेच रात्री पारवाडीत ब्राह्मणदेव पारवाडी मित्रमंडळाकडून सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. तसेच संजय घाडी मित्रमंडळातर्फे अल्पोपहार देण्यात आला. पहाटे डाळपस्वारी उत्सव संपला आणि देव रामेश्वराची रयत तृप्त मनाने आपल्या घरी परतली. (वार्ताहर)