शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी छप्पर कोसळले, सुदैवाने विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:37 IST

बिबवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या मोडकळीस आलेल्या छपराची कौले शाळा सुरू असताना कोसळली. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी छप्पर कोसळले सुदैवाने विद्यार्थी बचावले : बिबवणे येथील घटना

कुडाळ : बिबवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ च्या मोडकळीस आलेल्या छपराची कौले शाळा सुरू असताना कोसळली. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही.

याबाबत समजताच कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबवणे शाळा दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मंजूर केला नसल्याची माहिती यावेळी सभापती जाधव यांनी दिली. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला.बिबवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस आले असून, छपराची दुरुस्ती करण्यात यावी, याकरिता ग्रामस्थ तसेच शिक्षकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच आवश्यक ते प्रस्तावही दिले. तसेच कुडाळ पंचायत समितीच्यावतीनेही शाळेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे जानेवारी व मे महिन्यात पाठविला होता. मात्र, शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे शाळेच्या छप्पर दुरुस्तीचे काम प्रलंबित राहिले होते.सोमवारी सकाळी शाळा सुरू झाल्याने शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले होते. शाळा सुरू असतानाच सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास या शाळेच्या मोडकळीस आलेल्या छपरावरील काही कौले खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.घटना समजताच पालकांनी शाळेत गर्दी केली. तसेच बिबवणे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव व कुडाळचे गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.यावेळी सभापती जाधव म्हणाले की, बिबवणे शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अग्रक्रमाने पाठवून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले.

तालुक्यात अजूनही बऱ्याच शाळांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही या कामांना मंजुरी मिळाली नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनीही शाळेच्या छपराची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी केली. 

 

टॅग्स :Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग