शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 2, 2023 19:37 IST

तारकर्ली, मालवण, राजकोट, बोर्डिंग मैदान, सागरी महामार्गावर झाली रंगीत तालीम

मालवण : पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर शनिवारी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच दोन आणि तीन डिसेंबर रोजी रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याची कल्पना दिलेली असल्याने सर्वसामान्यांनीही त्याला प्रतिसाद दिला. सागरी महामार्ग, कोळंब पूल, बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, राजकोट, भरड, एसटीस्टॅण्ड, वायरी, तारकर्ली या मार्गावर दुपारी चार ते सहा या वेळात पोलिसांनी गाड्यांचा ताफा नेऊन रंगीत तालीम घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने नागरिकांनी उभे राहून पोलिसांच्या रंगीत तालीमचा आनंद घेतला.४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात आणि तारकर्ली मार्गावर सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांचा ताफा फिरवून तपासणी करण्यात आली. या ताफ्यामध्ये सर्व सुरक्षा यंत्राणांचे अधिकारी तसेच इतरही पथके सहभागी झाली होती.अन् ताफा रवाना झालापंतप्रधानांचे हेलिकॉप्टर बोर्डिंग मैदानावर उतरले अन् त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट राजकोट किल्ला येथे रवाना झाले. त्यानंतर पुन्हा ताफा माघारी फिरून सागरी महामार्गावरून तारकर्लीच्या दिशेने रवाना झाला. अशाप्रकारे शनिवारी दुपारी रंगीत तालीम घेण्यात आली. यात पन्नास ते साठ गाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. अशाचप्रकारे रविवारी दुपारी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यामुळे कोळंब मालवण, देऊळवाडा मालवण, मालवण तारकर्ली हे प्रमुख तिन्ही मार्ग बंद करून ठेवण्यात आले होते. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करत गाड्या थांबून वाहनांचा ताफा जाणारा मार्ग खुला करून ठेवला होता. पोलिसांनीही सर्व वाहनचालकांनी रविवारीही अशाचप्रकारे गाड्यांची वाहतूक थांबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.अनेक हात मदतीला सरसावले..४ डिसेंबर रोजी मालवण मध्ये होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त संपूर्ण राज्यातून आणि राज्या बाहेरून या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिस खात्याची बरीच माणसे मालवणमध्ये आली आहेत. त्यांच्या जागा सारख्या बदलत असतात किंवा वस्तीला आहेत तिथून त्यांच्या कामगिरीची ठिकाणे लांब असतात. बाहेरचे असल्याने येथील परिसराचीही माहिती नसते व बरेच जण चालत फिरताना दिसतात. आपणाला असे चालताना त्यांच्यापैकी कोणी दिसले तर त्यांना त्यांच्या ड्यूटीवर शक्यतो पोहोचवा, असे आवाहन केले जात आहे.समुद्रमार्गे रस्ता होणे आवश्यक....

सध्या नेव्ही कार्यक्रमासाठी सर्वच स्तरातून नियोजन चालले आहे. तसेच लोकांची प्रात्यक्षिके बघण्यासाठी जी गर्दी होते, त्यांचे नियोजन आणि काही तालुक्यातून शाळकरी मुले मोठ्या गाड्या घेऊन तारकर्ली पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तारकर्लीतील प्रमुख अडथळा उद्भवणारे अरुंद रस्ते हा मोठा प्रश्न आहे. शिवाय प्रशासनाच्या विविध डिपार्टमेंटची लोकं सतत ये-जा करीत आहेत, गाड्या वळवण्यासाठी पण मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी समुद्र किनाऱ्यावर रस्ता होण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदलPoliceपोलिस