शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात रोडरोमिओंचा वावर वाढला, अल्पवयीन धुमस्वार देतात पोलिसांना चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:38 IST

मालवण : मालवण एसटी बसस्थानक परिसरात गेले काही दिवस रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. सकाळच्या सत्रात महाविद्यालये आणि सायंकाळी शाळा, ...

ठळक मुद्दे मालवणात रोडरोमिओंचा वावर वाढलाअल्पवयीन धुमस्वार देतात पोलिसांना चकवा

मालवण : मालवण एसटी बसस्थानक परिसरात गेले काही दिवस रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. सकाळच्या सत्रात महाविद्यालये आणि सायंकाळी शाळा, हायस्कूल सुटल्यानंतर अल्पवयीन दुचाकीस्वार टोळक्याने बसस्थानक परिसरात येऊन मुली, युवतींना न्याहाळत असल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर हालचाल करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मालवण बसस्थानक हे प्रवाशांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेले असते. मात्र शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळेस रोडरोमियो आणि अल्पवयीन मुले दुचाकीने बसस्थानक परिसरात घिरट्या घालत असतात. त्यामुळे शाळकरी मुली भीतीच्या छायेखाली असून संशयितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

अलीकडील काळात अंमली पदार्थ सेवनात अल्पवयीन मुले अडकल्याची मुक्तचर्चा होत असताना त्याच नशेत मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात प्रामुख्याने अल्पवयीन मुले असून त्यांच्याकडे बुलेट सारख्या महागड्या दुचाकी असतात.रोडरोमिओंनी छेडछाड केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी मुलींमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालय प्रशासनाला कल्पना दिली आहे, त्यानुसार काही महाविद्यालय प्रशासनाने बसस्थानक परिसरात रोडरोमिओंवर पाळत ठेवली असता त्यांनी तिथून पोबारा केला. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अल्पवयीन मुलांकडून चोररस्त्यांचा वापरपोलिसांना चकवा देऊन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना बऱ्याचदा चोर रस्त्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडे कसलाही परवाना नसताना बुलेटसह अन्य महागड्या दुचाकी असतात. अल्पवयीन मुले अतिवेगाने दुचाकी चालवत असून पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी चोररस्ते म्हणजेच शहरातील छोट्या छोट्या गल्ल्यातून वाट काढतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी काही युवकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग