शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:43 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली असून मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

ठळक मुद्दे उपाययोजनांबाबत माहिती सादर करावैभव नाईक यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली असून मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

लवकरच याबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला जाणार आहे. त्या अनुषंगाने या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनीदिली.मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव उदय चौधरी यांनी त्या विभागांच्या सचिवांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मुद्यांची सद्यस्थिती व करावयाच्या उपाययोजना याबाबतची तातडीने माहिती सादर करण्यास कळविले आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत बैठक होईल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रशासकीय पातळीवर या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर यांनी आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय ३०० खाटांचे रुग्णालय असून वैद्यकीय महाविद्यालयाकडे येथील इमारती, जागा, मालमत्ता अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे हस्तांतरण करण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालक आणि सहसंचालकांकडे मार्गदर्शन मागविले आहे.सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात शासकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अस्तित्वात असलेल्या अनिवासी व निवासी इमारती, आवारातील मोकळी जागा, रुग्णालयीन विभाग आणि उपलब्ध यंत्रसामुग्री याची पाहणी २७ सप्टेंबर २०१६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समितीने केली होती. त्यांनी याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई यांच्याकडे सादर केला होता.शासकीय महाविद्यालयाबाबत हालचालींना वेगमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सकारात्मक असून कोविड तपासणी लॅबच्या उद्घाटनावेळीही त्यांनी सिंधुदुर्गात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या शासकीय महाविद्यालयाबाबत हालचालींना वेग आला आहे, असेही आमदार नाईक यांनी या म्हटले आहे.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Mediaमाध्यमेcollegeमहाविद्यालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग