शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

९३ कोटींचा महसूल जमा

By admin | Updated: April 2, 2015 01:26 IST

दिलीप मोरे : जिल्ह्यातील उत्पादन शुल्क कारभाराची माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते अद्यापपर्यंत साडेचार वर्षात तब्बल ९३ कोटी ४० लाख रूपयांचा महसूल शासनास जमा केला आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसताना हा एवढा मोठा महसूल गोळा करण्यास यश आले असल्याची माहिती जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक दिलीप मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.दिलीप मोरे हे येत्या चार महिन्यात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आपण केलेल्या सेवेची माहिती देण्यासाठी त्यांनी बुधवारी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. मोरे म्हणाले, आपण २१ आॅक्टोबर २०१० रोजी येथील विभागाचा अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी येथील महसूल हा जेमतेम १८ कोटी एवढा गोळा करण्यात येत होता. मात्र, मी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ठिकठिकाणी अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या वाहतुकीवर बऱ्यापैकी निर्बंध आणत जिल्ह्याचा महसूल १८ कोटींवरून २३.६४ कोटींपर्यंत नेला. यामध्ये सन २०११-१२ मध्ये २३.६४ कोटी, २०१२-१३ मध्ये २३.३८ कोटी, २०१३-१४ मध्ये २२.८६ कोटी, २०१४-१५ मध्ये २३ कोटी ५३ लाख एवढा असा मिळून ९३ कोटी ४० लाखाचा महसूल गोळा करण्यात यश आले आहे. (प्रतिनिधी)७७ वाहने केली जप्तपारदर्शक भरती प्रक्रियामाझ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोनवेळा भरती प्रक्रिया केली. यात कोणतीही हेराफेरी झाली नाही. यात जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन महिला पोलीस शिपायांना प्राधान्य देण्यात आले. भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी त्यांना मोफत दोन महिन्यांचे मार्गदर्शन केले असल्याची माहितीही यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक दिलीप मोरे यांनी दिली.९ पदे रिक्तवेळच्यावेळी कर्मचाऱ्यांची पदे भरली गेली व वाहने सुस्थितीत असतील तर जिल्ह्याच्या महसुलात वाढ होईल. मात्र, जिल्ह्यात या विभागात ४ पोलीस निरीक्षकाची, २ पोलीस उपनिरीक्षकाची व ३ पोलीस शिपायाची पदे रिक्त असल्याने तसेच ५ पैकी ३ गाड्या उपलब्ध नसल्याने महसूल गोळा होण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याची खंतही यावेळी मोरे यांनी व्यक्त केली.अनधिकृत दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या ७७ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.या वाहनांमध्ये ट्रक, टेम्पो, बस, कार या वाहनांचा समावेश आहे.तर अद्यापपर्यंत ७ वाहनांची लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करण्यात आली आहे, अशी माहिती दिलीप मोरे यांनी दिली.गेल्या साडेचार वर्षात जप्त करण्यात आलेल्या वाहन, दारू, हातभट्टी, लिकर असा मिळून तब्बल ६ कोटी ४५ लाख ५२ मुद्देमाल जप्त केला.