शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचे धुमशान, भातशेती आडवी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:03 IST

परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानामुळे मडुऱ्यासह पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. पाडलोस, न्हावेलीत ठिकठिकाणी शेतीची पावसामुळे दैना झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचे धुमशान, भातशेती आडवी

सावंतवाडी : परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानामुळे मडुऱ्यासह पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. पाडलोस, न्हावेलीत ठिकठिकाणी शेतीची पावसामुळे दैना झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेल्या बी-बियाण्यांचे पैसेही या परतीच्या पावसामुळे निघणे मुश्किल झाले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शहर बाजारपेठा फुलल्या असताना ग्रामीण भागात मात्र, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोर जावे लागत आहे.मडुरा, पाडलोस, रोणापाल, शेर्ले, कास, निगुडे, न्हावेली भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातशेती हे अनेकांचे उत्पन्नाचे साधन असल्याने बळीराजा दरवर्षी भातपीक घेतो.

यावर्षी भातशेती चांगली झाली होती. मात्र, पंधरा दिवसांपासून कडकडाटासह परतीच्या पावसाने मडुरा पंचक्रोशीत थैमान घातल्याने भातशेतीचे नुकसान झाले असून पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे भाताच्या लोंब्यांना मोड येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शेतकरी तथा पाडलोस ग्रामपंचायत सदस्य गणपत पराडकर यांनी सांगितले.पेरणीसाठी लागणारी बी-बियाणे विकत घेण्यासाठी तसेच शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या, जिल्हा बँकांमधून कर्ज काढले आहे. मात्र, आता भातशेतीच उद्ध्वस्त झाल्याने कर्जाचे पैसे फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. असे असले तरी सरकारी अधिकारी पंचनामे करण्यासाठी चालढकल किंवा दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.शाळेला दिवाळीची सुटी पडल्यामुळे मुले नरकासूर बनविण्यात मग्न आहेत. परंतु आठवडाभर पडत असलेल्या पावसाने यंदा नरकासूर बनविण्यात मुलांचा उत्साह दिसून आला नाही. परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला असून भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने कर्ज फेडण्याचे सोडाच, परंतु वर्षभर खायचे काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ठिकठिकाणी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी दिला आहे.क्यार वादळामुळे नागरिकांत भीतीअरबी समुद्र्रात निर्माण झालेल्या क्यार वादळामुळे गेले दोन दिवस सर्वत्र सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे मडुरा पंचक्रोशीत काही ठिकाणी पडझड झाली आहे. न्हावेली-रेवटेवाडी येथे वीज वाहिनीवर झाड पडून वीजपुरवठा बंद झाला होता. पाडलोसमध्येही झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वारा व पाऊस मोठा असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गेले चार दिवस पडत असलेल्या वादळी पावसामुळे मडुरा परिसरातील भातपीक आडवे झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग