शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार नोंदणीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:16 IST

सिंधुदुर्गनगरी : तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट १८ ते २१ वर्षे) मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक १ जुलै २0१७ ते दि. ३१ जुलै २0१७ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे. या मोहिमेंअतर्गत दि. ८ जुलै व दिनांक २२ जुलै या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करुन तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग प्राप्त झाला असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी केलेली आहे. या मोहिमेंतर्गत नाव नोंदणीसाठी एकूण ५ हजार ४८३ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

सिंधुदुर्गनगरी : तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट १८ ते २१ वर्षे) मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक १ जुलै २0१७ ते दि. ३१ जुलै २0१७ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे. या मोहिमेंअतर्गत दि. ८ जुलै व दिनांक २२ जुलै या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करुन तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग प्राप्त झाला असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी केलेली आहे. या मोहिमेंतर्गत नाव नोंदणीसाठी एकूण ५ हजार ४८३ अर्ज प्राप्त झालेले आहेत.आयोगाने युवा मतदारांच्या नोंदणीसाठी निर्धारित केलेले उदिष्ट गाठण्यासाठी यापुढेही काम करणे आवश्यक असल्याने शासनाने दिनांक १ आॅगस्टच्या पत्रान्वये ही मोहिम दिनांक ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत चालू ठेवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. जेणेकरुन भारत निवडणूक आयोगाच्या No Voter to be left behind या घोषवाक्यानुसार राज्यातील प्रत्येक मतदाराची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचे उदिष्ट साध्य करता येईल.मतदार यादीमध्ये मतदारांचा रंगीत व सुस्प्ष्ट फोटो असावा व त्या अनुषंगाने त्याला रंगीत  PVC मतदान ओळखपत्र देता यावे. यासाठी सर्वच मतदारांकडून रंगीत व सुस्पष्ट फोटो प्राप्त करुन घेण्याच्याही सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे छायाचित्र कृष्ण धवल स्वरुपात आहेत अथवा छायाचित्र उपलब्ध नाही, अशा मतदारांनी रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी-सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयांशी संपर्क साधावा.निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्तीकरिता नमुना न. ८ भरुन दिलेल्या मतदाराचे 1193 PVC-EPIC अतिशय इन्फोटेक लि. मुंबई यांचेकडून प्राप्त झालेली असून त्यांचे तालुक्यांना वाटप करण्यात आलेले आहे व नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची नावे माहे सप्टेंबर- आॅक्टोंबर २0१७ मध्ये प्रसिध्द होणा-या प्रारुप मतदार यादीमध्ये आल्यानंतर त्यांना PVC – EPIC चे वाटप करण्यात येणार आहे.भारत निवडणुक आयोगाने सेनादलातील मतदारांची नव्याने मतदार यादी तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर केलेला असून यादी तयार करताना सेनादलातील रेकॉर्ड अधिकारी- कमांडींग आॅफीसर यांनी त्याच्या स्तरावर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार दिनांक १८ आॅक्टोबर २0१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या २ हजार ३४६ सैनिक मतदारांची मतदार यादी अस्तित्वात आहे. तथापि, ही मतदार यादी रद्द करुन ती नव्याने तयार करावयाची असल्याने यासंदर्भात सैनिक मतदारांनी नाव नोंदणीसाठी त्यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.