शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा संकल्प करा  : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:36 IST

Shiv Sena Sindhudurg- विकासाच्या नुसत्या बाता मारून विरोधक जनतेला भुलवीत आहेत. मात्र, आपल्याला शिवसेनेचा विचार घराघरात पोचवायचा असून आगामी सर्व निवडणुकांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आता सज्ज व्हा. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा संकल्प करा  : विनायक राऊतकणकवलीत कोरोना योध्याचा सत्कार

कणकवली : विकासाच्या नुसत्या बाता मारून विरोधक जनतेला भुलवीत आहेत. मात्र, आपल्याला शिवसेनेचा विचार घराघरात पोचवायचा असून आगामी सर्व निवडणुकांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आता सज्ज व्हा. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले.कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात कोरोना काळात चांगले काम केलेल्या आशा स्वयंसेविकांचा ' कोरोना योद्धा' म्हणून कणकवली शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, नीलम सावंत- पालव, नागेंद्र परब,विकास कुडाळकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, गीतेश कडू, राजू शेट्ये, संदेश सावंत- पटेल, हर्षद गावडे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रीमेश चव्हाण आदी उपस्थित होते.खासदार विनायक राऊत म्हणाले, सतीश सावंत यांनी संचालकांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेत भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे. जिल्ह्यात दादागिरी काही ठिकाणी अजून बाकी राहिली आहे. ती नष्ट करायला हवी. शिवसैनिकांनी राज्य सरकारचे काम लोकापर्यंत पोहचवावे. तसेच येथील सर्वांगीण विकास होण्यासाठी कार्यरत व्हावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. यावेळी सतिश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. नीलम सावंत- पालव यांनी प्रास्ताविक केले.अंगावर आल्यास शिंगावर घेवू !आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून सकारात्मक निर्णय निश्चितच घेण्यात येईल. देशात सर्वात लोकांशी जास्त संपर्क असलेल्या खासदारांमध्ये विनायक राऊत यांचे नाव येते. चिपी विमानतळाचे श्रेय फक्त त्यांचेच आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक हे सोने आहे ,त्यांचे पक्षप्रमुखांवर खूप प्रेम आहे. त्या प्रेमाचे ताकदीत रुपांतर झाले पाहिजे. मी शांत आहे. पण कोणी अंगावर आल्यास त्याला शिंगावर घेण्याची ताकद माझ्यात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी काळजी करू नये. असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग